दरवर्षी ४ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय वन्यजीव दिन (National Wildlife Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- वन्यजीव संवर्धन, नष्ट होण्याच्या मार्गावर आलेल्या प्रजाती तसेच नैसर्गिक अधिवास जतन करण्याशी संबंधित मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो.
- समाजाला वन्यजीवांच्या केवळ पारंपरिक किंवा ठराविक प्रतिमांच्या पलीकडे जाऊन विचार करण्यास प्रवृत्त करणे हा या जनजागृती दिवसाचा मुख्य हेतू आहे
- वन्यजीवांसमोरील वाढत्या धोक्यांकडे लक्ष वेधणे - जसे की अधिवासाचा ऱ्हास, प्रदूषण, हवामान बदल तसेच बेकायदेशीर शोषण यांसाठी देखील हा दिवस महत्वाचा ठरतो.
दिवासाची पार्श्वभूमी:
- ४ सप्टेंबर हा प्रसिद्ध वन्यजीव संवर्धक स्टीव्ह इरविन यांचा जन्मदिन आहे.
- २००५ मध्ये प्राणी वर्तनतज्ज्ञ आणि समाजसेविका कोलीन पेज यांनी या दिवसाची सुरुवात केली होती.