जगभरात दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी 'जागतिक प्राणी दिन (World Animal Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • प्राणी कल्याण आणि त्यांच्या संरक्षणाच्या महत्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशासाठी जगभरात दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.
  • यंदाचा २०२६ सालची या दिवसाची १०१ वी आवृत्ती आहे.
  • २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'त्यांच्या नजरेतून जग पहा (See the World Through Their Eyes)' ही या दिवसाची २०२६ सालची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • या दिवसाची संकल्पना जर्मन कुत्र्यांचे अभ्यासक आणि प्राणी कल्याण कार्यकर्ते हेनरिक झिमरमन यांनी मांडली होती.
  • २४ मार्च १९२५ रोजी बर्लिन, जर्मनी येथे पहिला जागतिक प्राणी दिन साजरा करण्यात आला होता.
  • १९३१ मध्ये इटलीतील फ्लोरेन्स काँग्रेसमध्ये ४ ऑक्टोबर हा दिवस अधिकृतपणे 'जागतिक प्राणी दिन' म्हणून स्वीकारण्यात आला होता.