-
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिसर्या जागतिक नूतनीकरणयोग्य ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्सपो (Global Renewable Energy Investment Meeting and Expo - RE-Invest २०२०) चे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाद्वारे (Ministry of New and Renewable Energy) सदर शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
-
‘शाश्वत ऊर्जा संक्रमणासाठी नवकल्पना (Innovations for Sustainable Energy Transition)’ ही RE-Invest २०२० ची थीम आहे.
-
२०१५ आणि २०१८ मध्ये RE-Invest च्या पहिल्या २ आवृत्त्या संपन्न झाल्या आहेत.
-
भारताने २०२२ पर्यंत १७५GW आणि २०३० पर्यंत ४५०GW नूतनीकरणयोग्य ऊर्जासक्षम होण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.