-
दरवर्षी ३ डिसेंबर रोजी 'जागतिक दिव्यांग दिन (World Day of the Handicapped)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
दिव्यांग व्यक्तींच्या समावेशाशी संबंधित गंभीर समस्यांना समर्थन देणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
१९९२ मध्ये हा दिवस संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत घोषित करण्यात आला होता.
-
'दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व आणि सहभाग (Leadership and participation of persons with disabilities)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक दिव्यांग दिनाची' थीम आहे.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.