• नवी दिल्लीमधील हैदराबाद हाऊस येथे भारत - यूएस दरम्यानचा तिसरा २ + २ मंत्री संवाद (२ + २ Ministerial Dialogue) आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर हे भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत आहेत.

  • अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ आणि संरक्षण-सचिव मार्क एस्पर अमेरिकन प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करीत आहेत.

  • पहिला २ + २ मंत्री संवाद सप्टेंबर २०१८ मध्ये नवी दिल्लीत तर दुसरा वॉशिंग्टन डीसी येथे २०१९ मध्ये संपन्न झाला होता.

  • २०२० सालच्या यंदाच्या तिसर्‍या संवादादरम्यान परस्पर हितसंबंधातील सर्व द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांविषयी माहिती देण्याबरोबरच भू-स्थानिक सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.