• विजयनगर साम्राज्याची पूर्वीची राजधानी असणारे हंपी हे जागतिक वारसा स्थळ लवकरच एका नव्या जिल्ह्याचा भाग होईल अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे

  • कर्नाटक सरकारमार्फत विजयनगरला राज्यातील नवीन जिल्हा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

  • बल्लारीपासून निर्माण करण्यात येणारा विजयनगर हा राज्यातील ३१ वा नवीन जिल्हा असेल.

कर्नाटक राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा हे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.

  • राज्यपाल: वजुभाई वाला हे सध्या कर्नाटकच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्य स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी शहर: बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने कर्नाटक देशात ६ व्या स्थानावर आहे.