दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी 'जागतिक बचत दिन (World Savings Day)' जगभरात साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- पैशांच्या बचतीची सवय वाढवणे तसेच आर्थिक सुरक्षा व स्थैर्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- २०२६ ची संकल्पना /थीम(Theme): 'एआय (AI) सल्ला देते, मानव निर्णय घेतो. (AI Advises, human decides.)' ही या दिवसाची संकल्पना आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- इटालियन प्राध्यापक फिलिपो रॅविझा यांनी याची सुरुवात केली होती.
- १९२४ मध्ये इटलीमधील मिलान येथे आयोजित पहिल्या 'इंटरनॅशनल थ्रिफ्ट काँग्रेस (International Thrift Congress)' दरम्यान 'इंटरनॅशनल सेव्हिंग्ज बँकिंग इन्स्टिट्यूट' (ISBI) जी आता 'वर्ल्ड सेव्हिंग्ज बँक्स इन्स्टिट्यूट' (WSBI) म्हणून ओळखली जाते तिची स्थापना करण्यात आली होती.
- पहिला जागतिक बचत दिन ३१ ऑक्टोबर १९२४ रोजी साजरा करण्यात आला होता.