संयुक्त राष्ट्रांचा (United Nations - UN) 'जागतिक शहर दिन (World Cities Day)' दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • शहरीकरणापुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे तसेच जगभरात शाश्वत शहरी विकासाला चालना देणे या मुख्य उद्देशाने दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.
  • यंदाची २०२६ सालची या दिवसाची १३ वी आवृत्ती साजरी होत आहे.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'शहरांचे पुनरुज्जीवन: सर्वांसाठी पुरेशी गृहव्यवस्था (Regenerating the City: Adequate Housing for All).' ही या दिवसाची २०२६ सालची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत ठराव स्वीकारला जाऊन ३१ ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक शहर दिन' म्हणून घोषित करण्यात आला होता. 
  • २०१४ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली होती.
  • हा दिवस पहिल्यांदा ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला होता.