'भारताचे लोहपुरुष' म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day)' पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • यंदा २०२६ साली सरदार वल्लभभाई पटेल यांची १५१ वी जयंती साजरी करण्यात येत आहे.
  • २०२६ च्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन प्रामुख्याने केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे गुजरातच्या एकता नगर येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी (Statue of Unity)' येथे करण्यात येत आहे. 
  • गुजरात सरकार आणि 'स्टॅच्यू ऑफ युनिटी क्षेत्र विकास आणि पर्यटन प्रशासन प्राधिकरण (Statue of Unity Area Development and Tourism Governance Authority)' यांचे यामध्ये सहकार्य लाभले आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • २०१४ मध्ये भारत सरकारमार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर या दिवसाला 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून घोषित करण्यात आले होते.
  • भारताच्या एकत्रीकरणातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ही घोषणा महत्वपूर्ण होती.
  • पहिला 'राष्ट्रीय एकता दिवस' ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी साजरा करण्यात आला होता.