संयुक्त राष्ट्रसंघाचा 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन (International Translation Day)' दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • विविध राष्ट्रांना जोडणे तसेच संवाद, सहकार्य, विकास आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांना चालना देण्यात भाषा क्षेत्रातील व्यावसायिकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  • २०२६ ची संकल्पना/थीम (Theme): 'भाषिक विविधता आणि भाषिक अधिकार (Linguistic Diversity and Language Rights)' ही यंदाच्या २०२६ सालच्या या दिवसाची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • सर्वप्रथम १९९१ मध्ये 'आंतरराष्ट्रीय अनुवादक महासंघामार्फत (International Federation of Translators)' हा दिवस साजरा करण्यात आला होता.
  • २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत आपल्या ७१ व्या अधिवेशनादरम्यान ठराव मंजूर करत ३० सप्टेंबर हा दिवस अधिकृतपणे 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन' म्हणून घोषित केला होता.
  • ३० सप्टेंबर २०१७ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन साजरा करण्यात आला होता.