-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) ICICI बँकेवर ३ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सिक्युरिटीज एका वर्गातून दुसर्या वर्गात हलविण्याच्या संदर्भातील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सदर आर्थिक दंड ठोठावला गेला आहे.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.
ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.