संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेमार्फत (United Nations Educational, Scientific and Cultural Organization - UNESCO) दरवर्षी ३ नोव्हेंबर रोजी जागतिक स्तरावर 'आंतरराष्ट्रीय जीवमंडळ राखीव क्षेत्र दिन (International Day for Biosphere Reserves)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- जैवविविधतेचे जतन करणे तसेच शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- यंदाचा २०२६ सालचा हा ५ वा 'आंतरराष्ट्रीय जीवमंडळ राखीव क्षेत्र दिन' साजरा केला जात आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- स्पेन आणि उरुग्वे यांच्या विनंतीवरून युनेस्कोच्या कार्यकारी मंडळामार्फत आपल्या २११ व्या सत्रात ३ नोव्हेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय जीवमंडळ राखीव क्षेत्र दिन' म्हणून घोषित करण्याची शिफारस करण्यात आली होती.
- २०२१ मध्ये युनेस्कोच्या आमसभेच्या ४१ व्या सत्रात ठराव स्वीकारण्यात येऊन अधिकृतपणे ३ नोव्हेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय जीवमंडळ राखीव क्षेत्र दिन' म्हणून घोषित करण्यात आला होता.
- हा दिवस पहिल्यांदा ३ नोव्हेंबर २०२२ रोजी साजरा करण्यात आला होता.
UNESCO बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना होय.
- स्थापना वर्ष: १६ नोव्हेंबर १९४५ रोजी UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे UNESCO चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या UNESCO चे १९४ सदस्य आणि १२ सहयोगी सदस्य देश आहेत.
- सध्या कार्यरत महासंचालक: खालेद एल-एनी हे सध्या UNESCO च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.