-
दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान संपूर्ण भारतात 'वन्यजीव सप्ताह (Wildlife Week)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
भारतातील वनस्पती आणि प्राणी यांची सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने सदर दिवस साजरा करण्यात येतो.
-
२०२० सालचा ६६ वा वन्यजीव सप्ताह हा २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२० या कालावधी दरम्यान साजरा करण्यात येत आहे.
-
वन्यजीव सप्ताह २०२० हा 'रोअर (गर्जना आणि पुनरुज्जीवन) - मानव आणि प्राणी यांच्यामधील संबंध वृद्धिंगत करणे [RoaR (Roar and Revive) – Exploring Human-Animal Relationships]' या थीम अंतर्गत साजरा करण्यात येत आहे.
वन्यजीव सप्ताहाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
१९५२ साली भारतीय वन्यजीव मंडळाची (Indian Board of Wildlife) स्थापना करण्यात आली होती.
-
वन्यजीव संरक्षणाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी वन्यजीव सप्ताहाची कल्पना तयार करण्यात आली होती.
-
१९५५ मध्ये पहिल्यांदा वन्यजीव दिन साजरा करण्यात आला होता.
-
पहिला वन्यजीव सप्ताह १९५७ मध्ये साजरा करण्यात आला होता.