• ICICI बँक ही ‘स्विफ्ट जीपीआय इन्स्टंट (SWIFT gpi Instant)’ सुविधा देणारी जागतिक स्तरावरील दुसरी बँक बनली आहे.

ठळक मुद्दे

  • परदेशी भागीदार बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या वतीने त्वरित पैसे पाठविण्यास मदत करणारी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्विफ्टबरोबर ICICI बँकेने करार केला आहे.

  • ICICI बँक अशी सुविधा पुरविणारी आशिया-पॅसिफिकमधील पहिली तर जागतिक स्तरावरील दुसरी बँक ठरली आहे.

ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.