-
पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ते ४ मार्च २०२१ या कालावधीत होणाऱ्या आभासी 'मेरीटाईम इंडिया समिट (Maritime India Summit - MIS)' २०२१ च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत.
ठळक मुद्दे
-
सदर समिट ही केंद्रीय राज्य बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयामार्फत (Union Ministry of State for Ports, Shipping & Waterways - MoPSW) राबविण्यात येणारा प्रमुख उपक्रम आहे.
-
सदर समिटसाठी उद्योग भागीदार FICCI आहे.
-
'भारतीय सागरी क्षेत्र व्यवसायातील संभाव्य संधींचा शोध घेणे तसेच आत्मनिर्भर भारत बनविणे (Exploring the potential business opportunities in the Indian Maritime sector and making Aatmanirbhar Bharat)' ही सदर कार्यक्रमाची थीम आहे.
-
भारतीय बंदर आणि सागरी क्षेत्रात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही गुंतणुकींना चालना देणे हे या समिटचे मुख्य उद्दिष्ट आहे.