-
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची (Monetary Policy Committee - MPC) ४-६ ऑगस्ट रोजी २०२०-२१ ची दुसरी बैठक संपन्न झाली.
ठळक मुद्दे
-
दुसर्या आर्थिक धोरणांच्या बैठकीत चलनविषयक धोरण समितीने सध्याच्या स्थूल आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण केले आणि वाढीस पुनरुज्जीवन देण्याकरिता तसेच COVID-१९ चा परिणाम कमी करण्यासाठी अनुकूल भूमिका घेत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
-
या निर्णयांमुळे चलनविषयक धोरण समितीचे उद्दीष्ट हे आहे की महागाई ध्यानात घेऊन आर्थिक स्थिरता टिकविली जावी.
-
सन २०२०-२१ पर्यंत संपूर्ण GDP वाढ नकारात्मक होईल अशी अपेक्षा आहे.
चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
-
तरलता समायोजन सुविधेअंतर्गत (Liquidity Adjustment Facility - LAF) रेपो दर ४% इतका कायम ठेवण्यात आला आहे.
-
LAF अंतर्गत रिव्हर्स रेपो दर ३.३५% इतका कायम ठेवण्यात आला आहे.
-
सीमांत स्थायी सुविधा (Marginal Standing Facility - MSF) दर आणि बँक दर ४.२५% इतका कायम ठेवण्यात आला आहे.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालय: मुंबई येथे RBI चे मुख्यालय आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.