-
दरवर्षी २९ सप्टेंबर या दिवशी 'जागतिक हृदयदिन (World Heart Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
हृदयरोग आणि त्यासंबंधीच्या आरोग्य समस्या श्रेणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक वर्षी सदर दिवस साजरा केला जातो.
-
सदर दिवस हृदयविकार आणि त्याच्याशी निगडित विविध बाबींबद्दल जागरूकता निर्माण करून प्रतिबंध व नियंत्रण याबाबतच्या उपायांवर प्रकाश टाकतो.
-
२०२० सालच्या या दिवसाची थीम 'हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाला पराभूत करण्यासाठी हृदयाचा वापर करा (Use Heart To Beat Cardiovascular Disease)' अशी आहे.
जागतिक हृदय संघटनेबाबत (World Heart Federation) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २००० साली जागतिक हृदय संघटनेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: राजीव गुप्ता हे सध्या जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष आहेत.