दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी 'जागतिक स्ट्रोक दिन (World Stroke Day' पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • स्ट्रोकचा (मेंदूचा झटका) प्रतिबंध, सुरुवातीच्या लक्षणांची ओळख तसेच वेळेवर उपचार यांबाबत जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशाने दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी 'जागतिक स्ट्रोक दिन' पाळला जातो.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'प्रत्येक मिनिट महत्त्वाचे आहे (Every M1nute Counts)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • २००४ मध्ये कॅनडातील व्हँकुव्हर येथे आयोजित 'वर्ल्ड स्ट्रोक काँग्रेस' (World Stroke Congress) दरम्यान 'जागतिक स्ट्रोक दिना'ची सुरुवात झाली होती.
  • जागतिक स्तरावर स्ट्रोकबाबत जागरूकता वाढवण्यासाठी २००६ मध्ये डॉ. व्लादिमीर हचिन्स्की यांच्या मार्गदर्शनाखाली एका कार्यगटामार्फत 'जागतिक स्ट्रोक घोषणापत्र (World Stroke Proclamation)' तयार करण्यात आले होते.
  • २००६ मध्ये पहिल्यांदा पहिला जागतिक स्ट्रोक दिन पाळण्यात आला होता.