संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय काळजी आणि आधार दिन (International Day of Care and Support )' साजरा करण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • काळजी घेण्याशी संबंधित कामाचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच सर्वसमावेशक, लवचिक व शाश्वत काळजी आणि आधार प्रणालीमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • यंदाची २०२६ सालची या दिवसाची चौथी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'सन्मानजनक कामाद्वारे शाश्वत काळजी आणि आधार प्रणालींची उभारणी (Building Sustainable Care and Support Systems through Decent Work)' ही या दिवसाची २०२६ सालची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • २०२३ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारण्यात येऊन २९ ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय काळजी आणि आधार दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले होते.
  • पहिला 'आंतरराष्ट्रीय काळजी आणि आधार दिन' २९ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरा करण्यात आला होता.

UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
  • अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत. 
  • सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.