संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन (International Day Against Nuclear Tests - IDANT)' पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • अणुशस्त्रांच्या चाचणीदरम्यान होणाऱ्या स्फोटांचे हानिकारक परिणाम याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच अणुशस्त्रमुक्त जगाला प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी हा दिवस पाळला जातो.
  • यंदा २०२६ मध्ये या दिवसाची १७ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • 'संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या United Nations General Assembly - UNGA)' ६४ व्या अधिवेशनात २ डिसेंबर २००९ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावाद्वारे २९ ऑगस्ट हा दिवस 'आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले.
  • कझाकस्तानने सदर ठराव हा जागतिक पाठिंब्यासह मांडला होता.
  • सर्वप्रथम २९ ऑगस्ट २०१० रोजी हा दिवस पाळण्यात आला होता.
  • २९ ऑगस्ट या तारखेचे विशेष महत्त्व असे आहे की २९ ऑगस्ट १९९१ रोजी कझाकस्तानमधील 'सेमिपालातिन्स्क अणुचाचणी केंद्र' (Semipalatinsk Nuclear Test Site  - SNTS) बंद करण्यात आले. १९४९ ते १९८९ या काळात या केंद्रावर एकूण ४५६ अणुचाचण्या घेण्यात आल्या होत्या.

UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
  • अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत. 
  • सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.