दरवर्षी २८ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन (International Animation Day)' जगभरात साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- सदर दिवस हा ॲनिमेशनच्या जन्माचे प्रतीक मानला जातो.
- फ्रान्समधील पॅरिस येथे एमिल रेनॉड (Émile Reynaud) यांच्यामार्फत २८ ऑक्टोबर १८९२ रोजी त्यांच्या 'थिएटर ऑप्टिक' (Théâtre Optique) या उपकरणाद्वारे ॲनिमेटेड प्रतिमांचे पहिले सार्वजनिक प्रदर्शन केले होते.
- यंदाची २०२६ सालची 'आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिनाची' २५ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- २००२ मध्ये 'असोसिएशन इंटरनॅशनल डू फिल्म डी'ॲनिमेशन' या संस्थेमार्फत ॲनिमेशनच्या जन्माचे स्मरण म्हणून २८ ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले होते.
- पहिला 'आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन' २८ ऑक्टोबर २००२ रोजी साजरा करण्यात आला होता.