दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा करण्यात येणारा २०२६ सालचा 'जागतिक संस्कृत दिन (World Sanskrit Day)' यंदा २८ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे:

  • संस्कृत ही भारतातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे.
  • संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी जगभरात 'जागतिक संस्कृत दिन' ज्याला 'संस्कृत दिवस (Sanskrit Diwas)' किंवा 'विश्व संस्कृत दिनम (Vishva Samskrita Dinam)' असेही म्हटले जाते तो साजरा करण्यात येतो.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • शिक्षण मंत्रालयामार्फत (Ministry of Education - MoE) केंद्र आणि राज्य स्तरावर १९६९ मध्ये 'संस्कृत दिवस' साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली होती.
  • प्राचीन संस्कृत व्याकरणकार व संस्कृत व्याकरणावरील 'अष्टाध्यायी' या मूलभूत ग्रंथाचे लेखक पाणिनी यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
  • संस्कृत भाषेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच तिचे अध्ययन व अध्यापन वाढवण्यासाठी 'संस्कृत सप्ताह' साजरा केला जातो. यंदाचा 'संस्कृत सप्ताह २०२६' २४ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.