• दरवर्षी २७ ऑक्टोबर रोजी 'जागतिक दृकश्राव्य वारसा दिन (World Day for Audiovisual Heritage)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा UNESCO आणि 'दृकश्राव्य आर्काइव्ह्ज संघटना समन्वय परिषदेच्या (Coordinating Council of Audiovisual Archives Associations - CCAAA)' समन्वयाने साजरा केला जातो.

  • रेकॉर्ड केलेल्या ध्वनी आणि दृकश्राव्य दस्तऐवजांचे महत्वाबाबत जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशासाठी सदर दिवस निवडण्यात आला आहे.

  • 'जगासाठी तुमची खिडकी (Your Window to the World)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक दृकश्राव्य वारसा दिनाची' थीम आहे.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.