दक्षिण कोरियातील सोलमध्ये नुकताच २७ वा 'जागतिक ज्ञान मंच (World Knowledge Forum)' संपन्न झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • सोलमध्ये २७ व्या 'वर्ल्ड नॉलेज फोरम'ची (World Knowledge Forum) ८ सप्टेंबर २०२६ रोजी सुरुवात झाली होती.
  • थीम/ संकल्पना: 'प्रोमिथियन क्षण: सह-बुद्धिमत्ता व्यवस्थेची उभारणी (The Promethean Moment: Architecting the Co-Intelligence Order)' अशी २७ व्या 'जागतिक ज्ञान मंच (World Knowledge Forum)' ची थीम आहे.
  • कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सह-बुद्धिमत्ता (co-intelligence), जागतिक आर्थिक बदल, सायबर सुरक्षा तसेच नवोपक्रम यांवर ३ दिवस चाललेल्या या कार्यक्रमात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
  • जागतिक बदलांवर चर्चा करण्यासाठी राजकीय नेते, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये एकत्र आले होते.
  • सदर परिषद ही 'मेक्युंग मीडिया ग्रुप' (Maekyung Media Group) द्वारे प्रायोजित करण्यात आली होती.