दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी साजरा करण्यात येणारा 'जागतिक नदी दिन (World Rivers Day)' यंदा २७ सप्टेंबर साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे:
- नद्यांचे महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच जगभरात त्यांचे संरक्षण, संवर्धन व शाश्वत व्यवस्थापन यांना प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.
- यंदाची २०२६ सालची या दिवसाची २१ वी आवृत्ती आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- जलसंपत्तीचे उत्तम व्यवस्थापन तसेच संवर्धन करण्याच्या गरजेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने २००५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 'वॉटर फॉर लाईफ (Water for Life: २००५-२०१५)' हा 'कृतीसाठी आंतरराष्ट्रीय दशक (International Decade for Action)' उपक्रम सुरू केला होता.
- २००५ मध्ये मार्क अँजेलो यांनी संयुक्त राष्ट्रांकडे जागतिक नदी दिन दरवर्षी साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
- संयुक्त राष्ट्रांनी २९ जून २००५ रोजी अधिकृतपणे या दिवसाची घोषणा केली होती.
- पहिला जागतिक नदी दिन २८ सप्टेंबर २००५ रोजी साजरा करण्यात आला होता.