संयुक्त राष्ट्रांचा (United Nations - UN) 'जागतिक दृकश्राव्य वारसा दिन (World Day for Audiovisual Heritage)' दरवर्षी २७ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • दृकश्राव्य दस्तऐवजांचे जतन करणे तसेच त्यांच्या संरक्षणासाठी समर्पित असलेल्या व्यक्तींचा गौरव करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • यंदा २०२६ रोजी या दिवसाचा २१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.
  • २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'तुमच्या जगाची खिडकी (Your Window to the World)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • UNESCO मार्फत २००५ मध्ये आपल्या ३३ व्या सर्वसाधारण परिषदेदरम्यान ठराव स्वीकारत २७ ऑक्टोबरला 'जागतिक दृकश्राव्य वारसा दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले होते.
  • पहिला 'जागतिक दृकश्राव्य वारसा दिन' २७ ऑक्टोबर २००६ रोजी साजरा करण्यात आला होता.
  • युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization - UNESCO) आणि 'ऑडिओव्हिज्युअल अर्काइव्ह्ज असोसिएशनची समन्वय परिषद (Coordinating Council of Audiovisual Archives Associations - CCAAA)' यांचा संयुक्त उपक्रम म्हणजे हा दिवस आहे.