भारतीय सेनेमार्फत दरवर्षी २७ ऑक्टोबर रोजी 'पायदळ दिन (Infantry Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • राष्ट्रीय सुरक्षेमध्ये पायदळाच्या (Infantry) योगदानाचा सन्मान करण्याच्या मुख्य उद्देशाने हा दिवस साजरा करतात.
  • १९४७ मध्ये श्रीनगर विमानतळावर झालेल्या ऐतिहासिक अवतरणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस पाळण्यात येतो.
  • सदर दिवसाला 'शौर्य दिन' असेदेखील संबोधण्यात येते.
  • यंदाचा २०२६ सालचा हा ८० वा पायदळ दिन साजरा करण्यात येत आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • लेफ्टनंट कर्नल देवान रणजित राय यांच्या नेतृत्वाखाली 'सिख रेजिमेंट'ची पहिली बटालियन २७ ऑक्टोबर १९४७ रोजी श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) विमानतळावर उतरली होती.
  • पाकिस्तानपुरस्कृत आक्रमकांना रोखणे तसेच काश्मीरवर होणारा ताबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडणे या मुख्य उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली होती.
  • लेफ्टनंट कर्नल देवान रणजित राय यांना बारामुल्लाजवळ लढताना वीरमरण आले होते.
  • त्यांनी दाखविलेल्या अदम्य धैर्य आणि नेतृत्वासाठी त्यांना मरणोत्तर 'महावीर चक्र' देऊन सन्मानित करण्यात आले होते.