किर्गिस्तानमधील बिश्केक येथे नुकतीच २६ वी शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद (SCO Summit) संपन्न झाली आहे.
ठळक मुद्दे:
- शांघाय सहकार्य संघटनेच्या (Shanghai Cooperation Organization - SCO) २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ही परिषद संपन्न झाली.
- ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत SCO च्या 'राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची' २६ वी बैठक किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये आयोजित करण्यात आली होती.
- ही २ दिवसीय शिखर परिषद किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सादिर जापारोव्ह यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
- परिषदेचे ब्रीदवाक्य: 'SCO ची २५ वर्षे; शाश्वत शांतता, विकास आणि समृद्धीसाठी एकत्र (25 Years of the SCO; Together for Sustainable Peace, Development and Prosperity)' या खाली पार पडली.
- या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केले.
SCO शिखर परिषदेची प्रमुख वैशिष्ट्ये:
- SCO प्लस बैठक: 'न्याय्य जागतिक व्यवस्थेचा मुख्य घटक म्हणून संयुक्त राष्ट्र (UN): बहुध्रुवीय जगाच्या निर्मितीमध्ये SCO प्लस देशांचे योगदान (The UN as a Key Element of a Just World Order: The Contribution of the SCO Plus States to the Formation of a Multipolar World)' या संकल्पनेवर आधारित 'SCO प्लस' बैठक आयोजित करण्यात आली होती.
- २०२६-२७ साठी परिषद अध्यक्षपद: पाकिस्तानकडे २०२६-२७ साठी अध्यक्षपद सोपवण्यात आले असून 'दृष्टिकोनाचे कृतीत रूपांतर: संपर्क, नवोपक्रम आणि सामायिक समृद्धी (Turning Vision into Action: Connectivity, Innovation and Shared Prosperity)' ही तिची संकल्पना असणार आहे.
- २०२६-२७ साठी SCO पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी: २०२६-२७ या वर्षासाठी 'SCO पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी' म्हणून पाकिस्तानची राजधानी 'लाहोर'ची निवड करण्यात आली आहे.
SCO बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): SCO म्हणजेच Shanghai Cooperation Organization अर्थात शांघाय सहकार्य संघटना होय.
- स्थापना वर्ष: १५ जून २००१ रोजी SCO ची स्थापना करण्यात आली होती.
- संस्थापक देश: चीन, रशिया, कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांनी मिळून SCO ची स्थापना केली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: बीजिंग, चीन येथे SCO चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या SCO चे १० सदस्य देश आहेत. (भारत, चीन, रशिया, इराण, कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, पाकिस्तान आणि बेलारूस)
- भारताचा सहभाग: ९ जून २०१७ रोजी 'कझाकस्तानातील अस्ताना' येथील शिखर परिषदेत भारत या संघटनेचा पूर्णवेळ सदस्य बनला होता.
- सध्या कार्यरत महासचिव: नुरलान येर्मेकबायेव हे सध्या SCO च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
- अधिकृत भाषा: चीनी आणि रशियन या SCO च्या अधिकृत भाषा आहेत.