दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक पर्यावरण आरोग्य दिन (World Environmental Health Day)' पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- सुरक्षित तसेच आरोग्यदायी पर्यावरणाला चालना देणे आणि शाश्वत पर्यावरणीय पद्धतींना प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देश पूर्तीसाठी दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जगभरात हा दिवस पाळला जातो.
- यंदाची २०२६ सालची या दिवसाची १५ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
- यंदाची २०२६ सालची संकल्पना/ थीम (Theme): 'पर्यावरण आरोग्य: समुदायांच्या संरक्षणासाठी विज्ञानाची साथ (Environmental Health: Standing with Science to Protect Communities)' ही यंदाच्या या दिवसाची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- 'आंतरराष्ट्रीय पर्यावरण आरोग्य महासंघामार्फत (International Federation of Environmental Health - IFEH)' २०११ मध्ये बाली, इंडोनेशिया येथे झालेल्या बैठकीत अधिकृतपणे हा दिवस साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
- या दिवसाच्या वार्षिक आयोजनाचा समन्वय IFEH द्वारे करण्यात येतो.