• 'महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Elimination of Violence against Women)' दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • जगभरातील स्त्रियांना बळी पडाव्या लागणाऱ्या विविध प्रकारच्या हिंसाचाराचे खरे स्वरूप जाणवून देणे तसेच या वस्तुस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'ऑरेंज द वर्ल्ड: महिलांविरुद्धचा हिंसाचार संपवा! (Orange the World: End Violence against Women Now!)' ही यंदाच्या २०२१ सालच्या या आंतरराष्ट्रीय दिनाची थीम आहे.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.