जगभरात दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी 'जागतिक फार्मासिस्ट दिन (World Pharmacists Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • आरोग्यसेवा आणि समाजाच्या कल्याणामध्ये फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणे या मुख्य उद्देशासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.
  • सदर दिवस हा 'इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (International Pharmaceutical Federation - FIP) च्या स्थापनेचा वर्धापन दिन देखील आहे.
  • २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'अधिक आरोग्यदायी भविष्यासाठी फार्मासिस्टचे सक्षमीकरण (Empowering Pharmacists for Healthier Futures)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • 'तुर्की फार्मासिस्ट असोसिएशनमार्फत (Turkish Pharmacists Association)' २००९ मध्ये इस्तंबूल,तुर्की येथे झालेल्या FIP परिषदेदरम्यान जागतिक फार्मासिस्ट दिनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
  • २५ सप्टेंबर २०१० रोजी पहिला 'जागतिक फार्मासिस्ट दिन' साजरा करण्यात आला होता.
  • १९ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत FIP मार्फत 'जागतिक फार्मसी सप्ताह (World Pharmacy Week)' देखील साजरा करण्यात आला होता.