दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी 'जागतिक फुफ्फुस दिन (World Lung Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • फुफ्फुसे आणि श्वसनविकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी हा दिवस पाळला जातो.
  • २०२६ ची अधिकृत संकल्पना/ थीम (Theme): 'आयुष्यभर फुफ्फुसांचे आरोग्य (A Lifetime of Lung Health)' ही या दिवसाची २०२६ सालची संकल्पना आहे.
  • संपूर्ण आयुष्यात फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन ही संकल्पना करते.
  • 'फोरम ऑफ इंटरनॅशनल रेस्पिरेटरी सोसायटीज (Forum of International Respiratory Societies - FIRS)' आणि इतर सहयोगी संस्थांच्या पुढाकाराने २०२६ ची ही मोहीम राबवली जात आहे.