भारतीय जनसंघाचे (Bharatiya Jana Sangh) माजी अध्यक्ष आणि प्रख्यात विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी 'अंत्योदय दिवस (Antyodaya Diwas)' पाळला जातो.

ठळक मुद्दे:

  • यंदा २५ सप्टेंबर २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची ११० वी जयंती साजरी करण्यात येत आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • भारत सरकारमार्फत २५ सप्टेंबर २०१४ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी 'अंत्योदय दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
  • २५ सप्टेंबर २०१४ रोजी 'पहिला अंत्योदय दिवस' साजरा करण्यात आला होता.
  • एप्रिल २०१३ मध्ये 'राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाची (National Rural Livelihoods Mission - NRLM)' सुरुवात झाली होती.
  • २०१६ मध्ये NRLM चे नाव बदलून 'दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (Deendayal Antyodaya Yojana–National Rural Livelihoods Mission - DAY-NRLM) असे करण्यात आले होते.