दरवर्षी जगभरात २४ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत 'जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह (Global Media and Information Literacy Week)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • युनेस्कोमार्फत हा सप्ताह साजरा करण्यात आला आहे. 
  • माध्यम साक्षरता, चिकित्सक विचार आणि जबाबदार डिजिटल सहभागाला प्रोत्साहन देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश होता.
  • २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'आपण सर्वांची भूमिका आहे – लोकांसाठी माध्यम आणि माहिती साक्षरता (We All Play a Part – Media and Information Literacy for the People)' ही या सप्ताहाची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • या सप्ताहाची सुरुवात २०१२ मध्ये युनेस्कोच्या नेतृत्वाखालील एका सहयोगी उपक्रमाद्वारे झाली होती.
  • घाना, जमैका आणि सेंट व्हिन्सेंट अँड द ग्रेनाडाइन्स यांच्यामार्फत २०१८ मध्ये या सप्ताहाबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
  • युनेस्कोच्या महासंमेलनाद्वारे २०१९ मध्ये अधिकृतपणे 'जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह' दरवर्षी २४ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.

UNESCO बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना होय.
  • स्थापना वर्ष:  १६ नोव्हेंबर १९४५ रोजी UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे UNESCO चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UNESCO चे  १९४ सदस्य आणि १२ सहयोगी सदस्य देश आहेत.
  • सध्या कार्यरत महासंचालक: खालेद एल-एनी हे सध्या UNESCO च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.