दरवर्षी २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान 'संयुक्त राष्ट्र नि:शस्त्रीकरण सप्ताह (United Nations Disarmament Week)' पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- नि:शस्त्रीकरणविषयक जागरूकता आणि समज वाढवणे तसेच आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखण्यासाठी नि:शस्त्रीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १९७८ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत नि:शस्त्रीकरणावरील विशेष अधिवेशनाच्या अंतिम दस्तऐवजामध्ये 'नि:शस्त्रीकरण सप्ताह' साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
- हा सप्ताह संयुक्त राष्ट्रांच्या स्थापना वर्धापन दिनापासून म्हणजेच २४ ऑक्टोबरपासून सुरू होतो.
- १२ डिसेंबर १९९५ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारला गेला होता.
UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
- स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
- अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत.
- सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.