दरवर्षी २४ सप्टेंबर रोजी 'जागतिक सागरी दिन (World Maritime Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • सदर दिवस हा आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीचे महत्त्व तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत सागरी क्षेत्राची भूमिका अधोरेखित करण्याचे कार्य करतो.
  • २०२६-२०२७ या वर्षासाठीची संकल्पना / थीम (Theme): 'धोरणापासून अंमलबजावणीपर्यंत: सागरी क्षेत्रातील उत्कृष्टतेला चालना (From Policy to Practice: Powering Maritime Excellence)' ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
  • आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेमार्फत (International Maritime Organization - IMO) निवडली गेलेली ही संकल्पना आंतरराष्ट्रीय सागरी नियम आणि करारांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीशी संबंधित आहे.
  • ऐतिहासिकदृष्ट्या महत्व पहायला गेल्यास इतिहासात पहिल्यांदाच IMO द्वारे निश्चित केलेली या दिवसाची संकल्पना २०२६ आणि २०२७ मध्ये म्हणजेच सलग २ वर्षे राबवली जाणार आहे.