संपूर्ण भारतात दरवर्षी २४ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय सेवा योजना दिन (National Service Scheme Day - NSS)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या (Ministry of Youth Affairs and Sports - MYAS) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय सेवा योजना' (National Service Scheme - NSS) या युवा विकास कार्यक्रमाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.
दिवसाची पार्श्वभूमी:
- मेजर जनरल जगन्नाथ राव भोसले यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवा तसेच राष्ट्रनिर्मितीच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम 'राष्ट्रीय सेवा योजना' ही संकल्पना मांडली होती.
- २४ सप्टेंबर १९६९ रोजी भारतातील ३७ विद्यापीठांमध्ये डॉ. विजयेंद्र कस्तुरी रंगा वरदराज राव (तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री) यांच्या हस्ते 'राष्ट्रीय सेवा योजना' अधिकृतपणे सुरू करण्यात आली होती.
- १९६९ या महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या वर्षी ही योजना सुरू करण्यात आली होती.