दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक पोलिओ दिन (World Polio Day)' पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- पोलिओ या अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे त्याचे पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या जागतिक प्रयत्नांना बळकटी देणे या मुख्य उद्देशासाठी २४ ऑक्टोबर रोजी जगभरात हा दिवस पाळला जातो.
- २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'एक दिवस, एक ध्येय – पोलिओचे कायमचे उच्चाटन (One day, one focus, Ending polio for good)' हे या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- 'रोटरी इंटरनॅशनलद्वारे (Rotary International)' जागतिक पोलिओ दिनाची सुरुवात करण्यात आली होती.
- सदर दिवस हा अमेरिकन वैद्यकीय संशोधक डॉ. जोनास साल्क यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.