संयुक्त राष्ट्रांचा 'जागतिक विकास माहिती दिन (World Development Information Day)' दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- सध्याच्या घडीला भेडसावणाऱ्या जागतिक आव्हानांबाबत जनजागृती करणे तसेच माहितीचा प्रसार व आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- 'संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेच्या (United Nations Conference on Trade and Development - UNCTAD)' १९७२ मधील प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारून २४ ऑक्टोबर रोजी 'जागतिक विकास माहिती दिन' साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
- पहिला 'जागतिक विकास माहिती दिन' २४ ऑक्टोबर १९७३ रोजी साजरा करण्यात आला होता.