'संयुक्त राष्ट्र (United Nations - UN) दिन' दरवर्षी २४ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • १९४५ मध्ये २४ ऑक्टोबर या दिवशी 'संयुक्त राष्ट्र सनद (UN Charter)' लागू झाली होती त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस पाळण्यात येतो.
  • यंदा २०२६ साली संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा ८१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारून दरवर्षी २४ ऑक्टोबर हा दिवस 'संयुक्त राष्ट्र दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यामार्फत संयुक्त राष्ट्र सनदेप्रती भारताची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली आहे.
  • यासोबतच  मेजर अभिलाषा बराक यांना लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्र अंतरिम दलात बजावलेल्या कामगिरीबद्दल 'यूएन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड (UN Military Gender Advocate of the Year Award) २०२६' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
  • अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत. 
  • सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.