संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन (International Day of Sign Languages)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- कर्णबधिर व्यक्ती आणि सांकेतिक भाषेचा वापर करणाऱ्या सर्वांची भाषिक ओळख व सांस्कृतिक विविधता यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे जतन करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा केला जातो.
- यंदा २१ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत 'आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह (International Week of Deaf People)' २०२६ चा एक भाग म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे.
- २०२६ ची संकल्पना /थीम(Theme): 'कर्णबधिर व्यक्तींच्या मानवी हक्कांची घोषणा (Declaring Deaf People’s Human Rights)' ही यंदाच्या या दिवसाची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- 'जागतिक कर्णबधिर महासंघामार्फत (World Federation of the Deaf)' कर्णबधिर व्यक्तींच्या मानवी हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
- संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतर्फे हा ठराव मंजूर करून २३ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.
- २३ सप्टेंबर २०१८ रोजी हा दिवस सर्वप्रथम साजरा करण्यात आला होता.
- 'निळी रिबन' हे समानता आणि राष्ट्रीय सांकेतिक भाषांना मान्यता मिळवून देण्यासाठी कर्णबधिर समुदायाने केलेल्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.