दरवर्षी २३ ऑक्टोबर रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन (International Snow Leopard Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- हा दिवस 'जागतिक हिम बिबट्या दिन' म्हणूनही ओळखला जातो.
- हिम बिबट्याच्या संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्याच्या उंच पर्वतीय अधिवासांच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशांसाठी दरवर्षी २३ ऑक्टोबर रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
दिवसाची पार्श्वभूमी:
- २०१३ मध्ये किर्गिझ प्रजासत्ताकातील बिश्केक येथे आयोजित जागतिक हिम बिबट्या संवर्धन मंचात या दिवसाचा उगम झाला होता.
- हिम बिबट्याच्या अधिवासातील १२ देशांनी २०१३ मध्ये बिश्केक घोषणापत्र स्वीकारत २३ ऑक्टोबर हा जागतिक हिम बिबट्या दिन म्हणून घोषित करण्यात आला होता.
- पहिला जागतिक हिम बिबट्या दिन २३ ऑक्टोबर २०१४ रोजी साजरा करण्यात आला होता.