• भारतात २०१२ पासून दरवर्षी २२ डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय गणित दिन (National Mathematics Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस हा गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

  • यंदा २०२१ साली रामानुजन यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे.

  • लोकांना गणिताचा विकास तसेच मानवतेच्या वाढीमध्ये त्याचे महत्त्व याची जाणीव करून देणे हा सदर दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे.