'जागतिक गेंडा दिन (World Rhino Day)' हा दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- जगात गेंड्यांच्या अस्तित्वात असलेल्या ५ प्रजातींच्या संवर्धनाबाबत जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
- २०२६ सालची संकल्पना / थीम (Theme): 'पाचही प्रजातींना जिवंत ठेवा (Keep the Five Alive)' ही यंदाच्या २०२६ सालची या दिवसाची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- सर्वप्रथम २०१० मध्ये WWF-दक्षिण आफ्रिका द्वारे जागतिक गेंडा दिनाची घोषणा करण्यात आली होती.
- २०११ मध्ये संवर्धन क्षेत्रातील कार्यकर्ते लिसा जेन कॅम्पबेल आणि ऋषजा कोटा यांनी आफ्रिकन आणि आशियाई अशा दोन्ही प्रकारच्या गेंड्यांचा समावेश करून या दिवसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यास सुरुवात केली होती.