दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी लोकांना एका दिवसासाठी कारचा वापर टाळण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने 'जागतिक कार-मुक्त दिवस (World Car-Free Day)' पाळण्यात येतो.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १९७३ च्या इंधन संकटकाळात कारचा वापर कमी करण्याची संकल्पना सुरू झाली होती.
  •  १९९४ मध्ये स्पेनमधील टोलेडो येथे झालेल्या 'ॲक्सेसिबल सिटीज' परिषदेनंतर तिला अधिक चालना मिळाली होती.
  • रेकजाविक (आइसलँड) ला रोशेल (फ्रान्स) आणि बाथ (युनायटेड किंगडम/यूके) या शहरांनी सर्वप्रथम या उपक्रमाचा स्वीकार केला गेला.
  • १९९७ मध्ये ब्रिटनमध्ये 'एन्व्हायर्नमेंटल ट्रान्सपोर्ट असोसिएशनद्वारे (Environmental Transport Association - ETA)' पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील कार-मुक्त मोहीम राबवण्यात आली होती.
  • १९९९ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर युरोपमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय कार-मुक्त दिवस आयोजित करण्यात आला होता.