दरवर्षी २२ ऑक्टोबर रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय अडखळत बोलण्याबाबत जागरूकता दिन (International Stuttering Awareness Day)' पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • अडखळत बोलणे या बोलण्यातील प्रवाहीपणावर परिणाम करणाऱ्या विकाराबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच या स्थितीबद्दल समज वाढवून अडखळत बोलणाऱ्या व्यक्तींचा सर्वसमावेशक स्वीकार करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'अडखळत बोलण्याचे विविध प्रकार – तुमचे स्वरूप काय आहे? (SHADES OF STUTTERING – What’s yours?)' ही या दिवसाची २०२६ सालची संकल्पना आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • १९९५ मध्ये स्वीडनमधील लिंकोपिंग येथे झालेल्या एका परिषदेदरम्यान 'इंटरनॅशनल स्टटरिंग असोसिएशनमार्फत (International Stuttering Association - ISA)' जागतिक स्तरावर जागरूकता दिन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते.
  • १९९७ मध्ये हा दिवस पाळणे सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
  • पहिल्यांदा हा दिवस २२ ऑक्टोबर १९९८ रोजी पाळण्यात आला होता.