दरवर्षी २२ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्रांचा 'धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस (International Day Commemorating the Victims of Acts of Violence Based on Religion or Belief)' पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • संयुक्त राष्ट्र (United Nations - UN) दरवर्षी २२ ऑगस्ट रोजी धर्म किंवा श्रद्धेमुळे लक्ष्य केल्या जाणाऱ्या व्यक्तींविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराचा तसेच दहशतवादाचा निषेध करण्यासाठी 'धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस' पाळते.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • संयुक्त राष्ट्र आमसभेने २८ मे २०१९ रोजी ठराव मंजूर करत २२ ऑगस्ट हा दिवस 'धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून पाळण्याचे घोषित केले.
  • २२ ऑगस्ट २०१९ रोजी पहिल्यांदा हा दिवस पाळण्यात आला होता.
  • पीडितांना आधार देणे, आंतरधर्मीय आणि आंतर-सांस्कृतिक संवादाला चालना देणे, असहिष्णुता व द्वेषमूलक गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी मानवाधिकार शिक्षणाचा विस्तार करणे आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्याची राष्ट्रांची जबाबदारी पुन्हा अधोरेखित करणे या गोष्टींवर संयुक्त राष्ट्र आमसभेचा हा ठराव भर देतो.