-
भारतात दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रीय पोलीस स्मृतीदिन (National Police Commemoration Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
कर्तव्य बजावताना आपले जीवन अर्पण करणाऱ्या साहसी पोलिसांचे स्मरण आणि सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय पोलीस स्मृतीदिनाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखच्या भागामध्ये चीनी सैन्यामार्फत २० भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यात आला होता.
-
या हल्ल्यात १० भारतीय पोलिसांना आपला प्राण गमवावा लागला होता आणि ७ जणांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
-
सदर दिवसाच्या स्मृतीप्रित्यर्थ तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा शहीद जवानांच्या सन्मानार्थ पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.