जगभरात दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी 'जागतिक अल्झायमर दिन (World Alzheimer’s Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • हा दिवस मुख्यतः आजाराचे लवकर निदान होणे आणि स्मृतिभ्रंश याविषयी जनजागृती करण्यावर भर देतो.
  • मुख्यतः अल्झायमर तसेच इतर प्रकारच्या स्मृतिभ्रंशाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 'जागतिक अल्झायमर महिना' पाळला जातो.
  • २०२६ सालची संकल्पना/ थीम (Theme): 'तुम्हाला जितक्या लवकर समजेल, तितके अधिक तुम्ही करू शकाल: स्मृतिभ्रंशाचे निदान महत्त्वाचे आहे (The Earlier You Know, The More You Can Do: A Dementia Diagnosis Matters)' ही यंदाच्या या दिवसाची थीम आहे.
  • अल्झायमर या स्मृतिभ्रंशाच्या सर्वात सामान्य प्रकारात स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता तसेच दैनंदिन कामे करण्यामध्ये अडचणी येतात.
  • सामाजिक कलंक व भेदभाव दूर करणे आणि लवकर निदानाचे फायदे अधोरेखित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे असे 'अल्झायमर डिसीज इंटरनॅशनल (Alzheimer’s Disease International)' या संस्थेचे मत आहे.

'अल्झायमर' बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • अल्झायमर हा प्रगतशील म्हणजेच कालांतराने बळावणारा मज्जासंस्थेचा विकार असून स्मृतिभ्रंशाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.
  • जगभरातील स्मृतिभ्रंशाच्या प्रकरणांपैकी ६०-७०% प्रकरणे अल्झायमर रोगामुळे असू शकतात असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे.

अल्झायमर आजाराची सामान्य लक्षणे:

  • स्मरणशक्तीची कमतरता
  • वस्तू हरवून त्या पुन्हा शोधता न येणे
  • वेळ आणि ठिकाणाबाबत गोंधळ
  • निर्णयक्षमता आणि समस्या सोडवण्यात अडचण