दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय शांतता दिन (International Day of Peace) २०२६' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- २०२६ सालची संकल्पना / हीम (Theme): 'शांततेत गुंतवणूक करा – प्रत्येकासाठी, सर्वत्र आणि दररोज (Invest in Peace—For Everyone, Everywhere, Every Day)' ही यंदाच्या या दिवसाची थीम आहे.
- विविध समाजांमध्ये शांतता, अहिंसा आणि सहकार्य यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २१ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.
- शांतता प्रस्थापित करण्याकडे सर्व लोकांसाठीचे एक निरंतर कर्तव्य म्हणून ही संकल्पना पाहते.
- संयुक्त राष्ट्र स्थानिक पातळीवर स्वतःच्या कार्याद्वारे शांततेला प्रोत्साहन देणाऱ्या नागरिकांना 'दैनंदिन शांतता-निर्माते' असे संबोधत त्यांचा सन्मान करते.